dr.satish best web design developer for mac

कडलगे ग्रामपंचायत :

निसर्गाचे वरदान असलेलं व हिरण्यकेशी नदीकाठी वसलेले एक छोटसं गाव म्हणजे आमचं कडलगे गाव. कोल्‍हापूर जिल्ह्यातील गडहिंग्‍लज तालुक्यामध्ये वसलेले आमचं गाव. येथे पारंपारिक तसेच आधुनिक युगाचा छानसा समतोल पाहावयास मिळतो.गावातील उच्‍च शिक्षणामुळे गावातील प्रगतीचा दर वाढत चालला आहे. कडलगे हे गाव गडहिंग्‍लज पासुन 25 कि.मी अंतरावर आहे. तसेच गावास येण्‍या जाण्‍यास वाहतुकीच्‍या मुबलक सुविधा उपलब्‍ध आहेत. गावामध्‍ये विविध धर्माचे लोक एकत्र गुण्‍यागोविंदाने राहतात. गावास विविध पुरस्‍काराने सन्‍मानित करणेत आले आहे.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

ग्रामपंचायत कडलगे स्थापना 15 जून 1956 रोजी करण्यात आली. ग्रामपंचायतीमार्फत गावात विविध उपक्रम राबविले जातात. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच व इतर 9 सदस्यांची नेमणूक केली आहे. ग्रामपंचायत सदस्यांची नेमणूक हि दर पाच वर्षांनी लोकशाही मतातून केली जाते.

सरपंच
सौ. सुशिला सतिश शिरूर
गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
सौ. गौराबाई दुरदुंडी राऊत
गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. दत्ता कृष्णा पाटील
गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Kadalage Grampanchayat
A/p Kadalage Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416506

CONTACTS
Phone :

Office : 02327-22233657